मोहोळ येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘भव्य आरोग्य मेळावा’ संपन्न
सोलापूर : मोहोळ येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भव्य आरोग्य मेळावा आमदार यशवंत (तात्या) माने यांच्या अध्यक्षतेखाली व पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील व नगरसेविका सिमाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
दरम्यान मेळाव्यामध्ये राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली व गरजु रुग्णांनी या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन देखील आमदार यांनी केले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सा डॉ प्रदीप ढेले, वैद्यकीय अधीक्षक डॉ पी पी गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ पवनकुमार शिंदे, डॉ बाबर, डॉ. बाळासाहेब गवाड, गणेश धोत्रे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ पाथरुडकर, गटविकास अधिकारी गणेश मोरे, बापू डोके, मुस्ताक शेख, हेमंत गरड, गणेश धोत्रे, कुंदन धोत्रे, सतीश काळे, सुशील क्षीरसागरसह अन्य नगरसेवक, आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.