पर्यावरण संतुलनासाठी तानसा विभागातील तरूणाचा वृक्ष वाटपाचा अनोखा उपक्रम
शहापूर : तापमान लक्षात घेऊन वृक्षरोन करणे ही काळाची गरज बनलेली आहे. तसेच केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही तर वृक्ष संवर्धन, वृक्ष संगोपन करणे देखील तितकेच गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन तानसा विभागतील तरुण देविदास भोईर व सचिन शेलवले यांच्या पुढाकाराने तसेच दत्ता शेलवले, रुपेश पडवळ, राजा लुटे, भरत वलंबा, पप्पू दिवा, अविनाश भोईर, भालचंद्र निपुर्ते, मीनाक्षी बॉम्बे यांच्या सहकार्याने तानसा विभागांतील 42 मेहनती शेतकऱ्यांना ११ जातीतील ५० फळझाडे वाटप करण्यात आली.
ई श्रम कार्ड नोदणी, शासकीय दाखले वाटप शिबीर, PM Kisan EKYC ची कामे ह्या युवकांवर मार्फत विभागात केली आहेत. जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून ग्रीन यात्रा या संस्थेने वतीने ११ जातीतील फळ झाडे, औषधी झाडे आणि पर्यावरण संतुलित करणारी झाडे शेतकऱ्यानं पोहचवण्यात आली. या रोपांचे वाटप इच्छुक शेतकरी, पर्यावरण प्रेमी, संस्था, महिला मंडळ यांना करणार असून या रोपांचे लागवड, देखभाल आणि संगोपन कसे करावे याचे देखील मोफत प्रशिक्षण देणार आहे. सध्या तानसा विभागातून 42 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून त्यांना झाडे वाटप करण्यात आले आहेत .पुढील काळामध्ये ही पूर्ण तानसा व शहापूर मधील बहुतेक भागामध्ये शेतकरी सबळ बनवू असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.चांगल्या प्रकारे संगोपन करणाऱ्या शेतकऱ्याला तार कुंपण व पाण्यासाठी सहकार्य करण्याचे ही नियोजन केले आहे.
यावेळी नितीन पाटील (अध्यक्ष-ग्रीनयात्रा पहारे), खरे (पडघा फॉरेस्ट ऑफिसर), पुंडलिक पाटील (माजी सरपंच), शांताराम भोईर (वनरक्षक पहारे), सुनील भोईर (इंजिनियर वर्क) हे प्रमुख पाहूणे तसेच सुधीर शेलवले, तरुण युवा प्रतिष्ठान सामाजिक संस्था व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ शहापुरचे पदाधिकारी उपस्थित होते.