बोरसर गावातील कोल्ही रस्त्याचे काम आ. बोरणारे यांच्या प्रयत्नातून मंजूर !
वैजापूर (अशोक पवार) तालुक्यातील बोरसर गावातील कोल्ही रस्ता मागिल २० वर्ष पासून प्रलंबित रस्त्याचे काम आमदार रमेश बोरणारे यांच्या प्रयत्नातून मंजूर व रस्त्याच्या कामाला सुरुवातही झाली आहे. तसेच शेतकऱ्यांनी आमदार बोरणारे यांच्याशी चर्चा केली.
वीस वर्षांपासून या रस्त्याची फार दुर्दशा झाली होती. या रस्त्याने पायी सुद्धा नीट चालता येत नव्हते. तालुक्याला दवाखान्यात नेण्यासाठी जो त्रास सहन करावा लागत होता. तो फक्त आणि फक्त बोरसर गावकऱ्यांनी सहन केला. आज वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांच्या निधीतून माती मुरूम टाकून गावातील लोकांना व शेतकऱ्यांना येण्या-जाण्याचा रस्ता मार्ग मोकळा केला. यावेळी गावातील नागरिक व आमदार रमेश बोरणारे व ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील पवार व संजय पाटील पवार, कारभारी पाटील, पवार आरूण होले व गंजान पाटील, कानाडे व निवृत्ती शेवाळे कैल्यान पाटील, पवार, अशोक पाटील पवार बोरसरकर, गावातील नागरिक उपस्थित होते.