ओझर
जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार
ओझर (प्रतिनिधी) जागतिक महिला दिनानिमित्त ओझर पोलीस स्टेशन, बसवंत पिंपळगाव पोलीस स्टेशन व सायखेडा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मिराबाई गोसावी व माधुरी गोसावी यांनी पेन, पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार केला.
यावेळी दत्तात्रय गोसावी, पो कादरी (सहा.पोलीस निरीक्षक सायखेडा पोलीस स्टेशन), पो अशोक रहाटे (पोलीस निरीक्षक ओझर पोलीस स्टेशन), पो भाऊसाहेब पठारे (पोलीस निरीक्षक बसवंत पिंपळगाव पोलीस स्टेशन) इत्यादी उपस्थित होते.