श्री गणेश विद्या मंदिर दातिवली शाळेत जागतिक महिला दिन संपन्न
दातिवली (सचिन शेलवले) शिवदत्त ज्ञान प्रसारक मंडळ संचलित, श्री गणेश विद्या मंदिर दातिवली, प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक लिलावती कला, वाणिज्य विभाग, माय मदर इंग्लिश स्कुल तसेच जिजाऊ बाल संस्कार केंद्र या संस्थेतील सभागृहा मध्ये नुकताच जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा लिलावती लक्षण म्हात्रे तसेच संस्थेचे पदाधिकारी शिवदत्त म्हात्रे, साईनाथ म्हात्रे, दिनेश म्हात्रे, गिता म्हात्रे तसेच केतकी म्हात्रे या उपस्थित होत्या. तसेच प्राथमिक विभागातील मुख्याध्यापक व शिक्षकवृंद तसेच बाल संस्कार केंद्रांच्या शिक्षिका तसेच संगणक शिकविणाऱ्या शिक्षिका यासुद्धा उपस्थित होत्या. या कार्यक्रमात प्रथम या संस्थेत शिकविणाऱ्या शिक्षिकांचा संस्थेच्या पदाधिकार्यांकडुन गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या अध्यक्षा व पदाधिकारी यांचा सुद्धा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमा बरोबर इयत्ता १ ली ते ७ वी च्या मुलींनी वेशभुषा स्पर्धेत भाग घेतला होता. प्रत्येक मुलींनी आपल्या वेशभुषे बदद्ल मनोगत व्यक्त केले. कोणी डॉक्टर, कोणी झाशीची राणी, कोणी सावित्री बाई फुले, कोणी जिजाऊ माँ साहेब, कोणी शिक्षिका बणून आल्या होत्या. सर्वांनी चांगल्या प्रकारे तयारी केली होती. शेवटी संस्थेचे सचिव साईनाथ म्हात्रे सरांनी जागतिक महिला दिनाचे महत्व विशद केले. तसेच आपल्या शाळेतील बहुसंख्येने मुली प्रत्येक कार्यक्षेत्रात पुढे आल्या पाहिजेत. त्यांनी कार्यक्रमास जमलेल्या सर्वांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.