महाराष्ट्र
शिंदखेडा येथील बी.के.नगरातील सावंत यांच्या घराजवळ आढळला जातीवंत नाग
सर्पमित्रांची यशस्वी कामगिरी
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील बी.के.देसलेनगर रहिवासी पत्रकार यादवराव सावंत यांच्या घराजवळ चॅनल गेट मध्ये काल दुपारी पाच वाजेच्या सुमारास जातीवंत असली नाग सात ते आठ फुटाचा फणा करून स्थित घरातील लोकांना आढळून आला.
त्यानंतर त्यांचे भाचे पंकज अहिरे यास फोन करून शहरातील सर्पमित्र सचिन चौधरी, विशु डोदवे, सचिन बडगुजर यांना बोलावले. सदर सर्पमित्रांनी आपल्या कलेचा वापर करून यशस्वी रित्या पकडले. त्यानंतर त्यास पाणी व दुध पाजून एका बंद डब्यात घालून जंगलात सोडून दिले. एवढया भल्यामोठ्या नागास पकडल्या बद्दल बी.के. देसले याचे नगर रहिवासी व शहरातुन कौतुक केले जात आहे.