महालगाव येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
वैजापूर (प्रतिनिधी) वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य एकनाथराव जाधव तसेच भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस तथा संचालक औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक दिनेश परदेशी यांनी क्रिकेट टेनिस बॉल खेळणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहित केले. आपण खेळा व आपलं टॅलेंट दाखवा जेणेकरून तुम्ही आपल्या गावाचे तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव लौकिक कर्षाल हे सांगून एकनाथ जाधव यांनी बॅटिंग केली व दिनेश परदेशी यांनी बॉलिंग करून त्या क्रिकेट स्पर्धेचा स्टेडियमचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य तथा सरपंच भाऊसाहेब पाटील झिंजुर्डे पंचायत समिती सदस्य डॉक्टर बाबासाहेब डांगे ,जिल्हा कार्यकारणी सदस्य नितीन जोशी , मा.जि.प. सदस्य शिवाजी काळे, मंगेश गायकवाड, दत्ता पाटील नांगरे, रजनीकांत नजन, रामेश्वर पाटोळे, हरी बोडखे, कडु कुरकुटे, विजय चव्हाण, कुणाल चव्हाण, विकास जाधव, बंडोपंत आल्हाट, सुनील दादा काळे, गोरख आहेर, अशोक पाटील आहेर, सोमनाथ पाटील झिंजुर्डे, सुरेश जी जाधव, तुषार गायके आदि ग्रामस्थ व खेळाडू हजर होते.