राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी पटेल यांच्या वतीने चरण बद्ध आंदोलनाची घोषणा !
पातुर (प्रतिनिधी) राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल यांच्या वतीने चरण बद्ध आंदोलनाची घोषणा केली आहे. आणि हे आंदोलन ३१ राज्यात ५६३ जिल्हात येत्या २२ मार्च २०२२ ला प्रथम टप्पा जिल्हास्थरीय चरण सम्पन्न होत आहे.

तरी ही सर्व ओबीसी बांधवांनी, १) ओबीसी चा जाति आधारित जनगणना साठी, २)आदिवासी बांधवांना जल जंगल जमीन पासुन विस्थापित करण्यात आले, ३) शेतकरी बांधवांना एमएसपी कायद्याच्या स्वरूपात, ४) पेंशनर जेष्ठ नागरिकांना जुनी पेंशन योजना लागू करणे संदर्भ, ५) ओबीसी ला सेपरेट इलेक्ट्रोरेट मीळण्याबाबत, ६) डीएनए बेस एनआरसी लागू करने समर्थनात, ७) मजुरांच्या विरोधात आणि पुंजी पत्ती च्या समर्थनात सरकारने जो कायदा बनवलेला आहे. त्याच्या विरोधात, ८) ईव्हीएम घोटाळा च्या विरोधात, ९) जबरदस्ती व्हॅक्सिनेशन करण्याच्या विरोधात, १०) प्रायव्हेट क्षेत्रामध्ये एससी एसटी ओबीसीला आरक्षण मिळण्याच्या समर्थनात या दहा मुद्यावर राष्ट्रीय पिछडावर्ग मोर्चाद्वारे आंदोलन करण्यात येत आहे.

आंदोलनात सहभागी होऊन सरकारच्या चुकीच्या धोरणांचा विरोध करुन केंद्र सरकारला ठासुन सांगण्याची वेळ आज आपल्यावर आली आहे, असं ता.उपध्यक्ष प्रशांत विक्रांत उपर्वट म्हणाले.



