महाराष्ट्र
कोल्ही माध्यम प्रकल्प कॅनलचे दुरुस्ती कामाला आ. बोरणारे यांच्या प्रयत्नातून मंजुरी
वैजापूर (अशोक पवार) कोल्ही हे धरण १००% भरलेली असतानाही शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा फायदा होत नव्हता म्हणून शेतकर्यांनी आमदार बोरणारे यांच्याकडे वारंवार समस्या मांडून कॅनल च्या कामाची मंजूर करून लगेच कामाला सुरुवात केली.
त्यामुळे कॅनल च्या पाण्यामुळे कोल्ही सुदामवाडी बोरसर या गावातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. तसेच शेतकऱ्यांची जमीन ओलाव्यात खालील येणार आहे. कॅनलच्या दुरुस्ती कामाचे शुभारंभ करण्यात गावातील शेतकरी संजय पवार, उत्तम आप्पा पवार, मोहन सोनवणे, प्रभाकर सोनवणे, चांगदेव पवार, राजेंद्र सोनवणे, नारायण पवार, आत्माराम गायकवाड, मधुकर शेवाळे, संजय शेवाळे, गणेश शेवाळे, दीपक पवार गावातील नागरिक उपस्थित होते.



