सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
शहापूर (प्रतिनिधी) सोनुभाऊ बसवंत कला व वाणिज्य महाविद्यालय, शहापूर येथे “जागतिक महिला दिन” हा कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थीनीकरिता करता सेल्फ डिफेन्स (Self-Defense) या कार्यक्रमाचे आयोजन सकाळी १० ते ११ या वेळात करण्यात आले.
माधुरी तारमळे हिने अडचणीच्या वेळी मुलींनी स्वतःचे संरक्षण कसे करावे, यासंदर्भात प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणात मुलींचा सहभाग भरगोष होता. त्यानंतर महाविद्यालयातील महिला कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सकाळी ११.३० ते १२.३० या वेळात हायजिन अँड डेव्हलपमेंट (Hygiene and Development) या विषयावर नीलिमा पाटील, जिल्हा निरीक्षक, ठाणे यांनी व्याख्यान दिले. तसेच शहापूर पोलिस स्टेशनमधून सहाय्यक पोलीस निरीक्षक, केंद्रे व इतर महिला कर्मचारी यांनी महाविद्यालयात येऊन महिलांचे जागतिक महिला दिनानिमित्त स्वागत केले व महिलांचे प्रबोधन केले अशाप्रकारे महाविद्यालयात “जागतिक महिला दिन” उत्साहात साजरा करण्यात आला.