काय ते गाव, काय त्या गावच्या तुडुंब गटारी काय ती अस्वच्छता. सरपंच ग्राम सेवक मात्र एकदम ओके मध्ये.
वरगव्हान गाव च्या समस्यांनी ग्रामस्थ हैराण.
दिनांक: २२ जुलै २०२२: प्रतिनिधि-जळगांव
जळगांव जिल्हाचे चोपडा तालुक्यातील वरगव्हाण गावात घाणीचे साम्राज्य, निर्माण झाले असून गटारीचे पाणी चक्क रस्त्यांवरून वाहू लागले आहे.तर गावात स्वच्छ भारत मिशन ह्या योजने अंतर्गत १८ महिन्यांपूर्वी महिला व पुरुषांच्या साठी स्वच्छता गृह मंजूर करण्यात आले होते, परंतू १८ महिन्याचा कालावधी जाऊन सुद्धा स्वच्छतागृह चे काम अजुन अपूर्ण आहे.
२७ डिसेंबर २०२१ ह्या तारखेला एक भुमीगत गटार आणि कोंक्रेटिकरण चे मोठ्या थाटात भुमिपुजन करण्यात आले होते, परंतु ७ महिने उलटुन अजुन सुद्धा कामाचा थांग पत्ता नाही, सरपंच निवड झाल्या पासुन गावातील गटार ह्या फक्त २ वेळेस काढल्या गेल्या आहेत, त्यात एवढी घाण आहे की गटारीचे पाणी हे रस्त्यावरून वाहत आहे, त्यामुळे गावातील ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.या आधीही गा गंभीर प्रकारे गॅस्ट्रोची साथ लागून तब्बल चारशे लोक बाधीत झाले होते.ती शक्यता आताही बळावली आहे.ग्रामसेवक महाशय तर २० ते २५ दिवस गावात यायचं नावच घेत नाही.
खुद्द ग्राम पंचायत सदस्यांना घराचा उतारा प भेटत नाही. तर इतरांचा विचारच न केलेला बरा.सरपंच हे सगळं होतं असतांनाही गावात काहीही समस्या नसल्याच्या आविर्भावात वागतात.म्हुणून ग्रामस्थ वैतागले आहेत.व गावातील समस्या लवकरात लवकर सोडवल्या नाही तर १५ ऑगस्ट ला उपोषणाला बसण्याचा ईशारा ग्रामस्थांच्यावतीने दिला आहे.