मनुर जिल्हा प्रशाला विद्यार्थ्यांची होती मानसिकता खराब .
दिनांक: २२ जुलै २०२२ प्रतिनिधि: गहनीनाथ वाघ
औरंगाबाद : जिल्हा परिषद प्रशाला मनुर शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतोय परिणाम एकीकडे शासन म्हणते की शिका आणि संघटित व्हा पण शिक्षण घेण्यासाठी शाळेत शिक्षकांची कमतरता शिक्षक कमी असल्याने दोन वर्गाचे एक वर्ग करून विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे ज्या ठिकाणी तीस मुले बसवले जातात त्या वर्गात साठ मुले बसून शिक्षक शिकवीत आहे विद्यार्थ्यांना वर्गात व्यवस्थित बसता ही येत नाही बसण्यासाठी वर्गात योग्य जागा नसल्यामुळे दाटी होत आहे त्यामुळे शिक्षणावरचा शिकण्याचा दृष्टिकोन कमी होत आहे अशा अडचणीमुळे शिकावं की नाही अशा समस्या विद्यार्थ्यांसमोर येत आहे त्यामध्येच शाळेमध्ये शिक्षकही कमी आहे आज रोजी माध्यमिक शिक्षक चार पदवीधर चार शिपाई दोन जुनियर कलर एक अशा शिक्षकांची व कर्मचाऱ्यांची गरज असताना शाळेमध्ये आज रोजी आठ शिक्षक रुजू आहेत व या शाळेला १७ ते १८ शिक्षकांची गरज असून शाळेत शिक्षक नसल्याकारणाने दोन तुकडीची एक तुकडी करून विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे पाच ते दहा एकूण विद्यार्थी संख्या ४११ आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता वर्गामध्ये जागा शिक्षक नसल्या कारणामुळे शिक्षणावरची मानसिकता कमी होत आहे अशा प्रकारचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे व विद्यार्थ्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी लवकरात लवकर या शाळेत शिक्षक वाढवावे असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.