आरोग्य व शिक्षणजळगाव जिल्हामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य.

दिनांक : २२ जुलै २०२२ प्रतिनिधि – सतीश बावस्कर‌ – बोदवड:बोदवड तालुक्यातील शेलवड येथील आदर्श बहुद्देशीय जिल्हा परिषद शाळेच्या अंगणात घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येत असून विद्यार्थांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे?पावसाळयात अंगणात पाणी साचत असून विद्यार्थ्यांच्या दृष्टिने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो बाजूलाच पडलेल्या घन कचरा जास्त दिवस पडून असल्याने कुजून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून रोगराई पसरण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

शेलवड ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज केला तरी कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. सदर शाळेच्या अंगणात उकिरडे टाकून घनकचरा कुजून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून गावातील ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष असल्याने पालक वर्गातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या स्वच्छता विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मुलांच्या आरोग्याची काळजी घेत प्रशासनाने परिसर स्वच्छ ठेवावा

मुख्याध्यापक श्रीकृष्णाजी इंगळे मोतीलाल भोई शिवाजी पाटील गोकुळ नेरकर वैभव पर्वते राहुल चौधरी अशी मागणी मोठ्या प्रमाणात पालक शिक्षक वर्गातून होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे