शिवसेना महिला आघाडीच्या स्त्री शक्तीचा सन्मान कार्यक्रमास महिलांचा उदंड प्रतिसाद
यशस्वी महिलांचे मार्गदर्शन, विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाला रंगत
सिल्लोड (विवेक महाजन) जागतिक महिला दिनानिमित्त महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून सिल्लोड येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सन्मान स्त्री शक्तीचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचे मनोगत व मार्गदर्शन, विविध स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांनी हिरीरीने सहभागी होत आनंद लुटला.
थोरमातेंचे पूजन तसेच दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, महामार्ग सुरक्षा पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड, नायब तहसीलदार कमल मनोरे, वडोदबाजार पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव, सिल्लोड शहर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नालंदा लांडगे, पंचायत समितीच्या सभापती डॉ. कल्पना जामकर, नगराध्यक्षा राजश्री निकम यांच्यासह डॉ. सुषमा मिरकर, डॉ. रश्मी सपकाळ, डॉ. अकाते, डॉ. चौधरी, कविता सराफ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षण कल्पना राठोड यांनी महिलांना रस्ता सुरक्षा बाबद मार्गदर्शन केले तर साहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव व नालंदा लांडगे यांनी महिलांसाठी कायद्याचे संरक्षण विषयी माहिती दिली. महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी यासाठी डॉ. रश्मी सपकाळ व डॉ. सुषमा मिरकर यांनी मार्गदर्शन केले. उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर आदींनी उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी महिलांसाठी संगीत खुर्ची, लिंबू चमचा, उखाणे यासारख्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तसेच सुर्या स्पोर्ट ऍकॅडमीच्या विद्यार्थीनींनी स्वतःचे आत्मसंरक्षण कसे करावे याचे याठिकाणी चित्त थरारक कराटेचे प्रत्यक्षित केले. शेवटी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते स्पर्धेतील विजेत्या महिलांना पारितोषिक व बक्षीस वाटप करण्यात आले. शिवसेना महिला आघाडीच्या दीपाली भवर, मेघा शाह, वर्षा पारखे, स्नेहल कारले तसेच डॉ. दत्ता भवर यांनी कार्यक्रमाचे संचलन केले.