सार्वजनिक बांधकाम विभाग बोदवड यांच्याकडून जनतेस फुकटचा बॉडी मसाज
बोदवड (प्रतिनिधी) येथील सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाणे तालुक्यातील निकृष्ट कामाना बळ देण्याचे काम सध्या सुरू असून तालुक्यात होत असलेल्या रस्ताच्या कामाबाबत नागरिक नाराज आहे. सुरु असलेले रस्त्यांचे काम हे गुणवत्तापूर्ण नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. तसेच जे रस्ते तालुक्यात झाले आहेत. ते निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्त्यावर मुदतीच्या आत खड्डे पडले आहेत.
यामुळे प्रवास दरम्यान हादरे बसून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे शारीरिक व्याधी निर्माण झाल्यास कोण जबाबदार असा प्रश्न नागरिक निर्माण करीत आहे. तर काही नागरिक सार्वजनिक बांधकाम विभाग बोदवड यांच्या बद्दल उपहासात्मक बोलत म्हणत आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग बोदवड यांच्याकडून फुकट चा बॉडी मसाज तालुक्यातील जनतेस मिळत आहे. याकडे वरिष्ठ पातळीवरुन वा लोकप्रतिनिधी लक्ष देतील का ? की परिस्थिती जैसे थी वैसे राहील याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.