शिंदखेडा येथील आ. जयकुमार रावल यांच्या हस्ते गांधी चौक येथील रस्त्याचा कामाचे भूमिपूजन व सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार सोहळा संपन्न
शिंदखेडा (यादवराव सावंत) माजी मंत्री तथा शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमारभाऊ रावल यांचा हस्ते नगराध्यक्षा रजनी वानखेडे, उपनगराध्यक्ष प्रकाश आप्पा देसले व गट नेते रावसाहेब अनिल वानखेडे यांचा उपस्थितीत, गांधी चौक ते हैदर अली चौक पर्यंत तहसील कार्यालय ते गांधी चौक व राजेंद्र शिवदास देसले यांचे घर ते गांधी चौक पर्यंत काँक्रीट रस्ता मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच विकासो निवडणुकीत सहकार पॅनल चे संचालकांचा सत्कार आमदार जयकुमार यांचा हस्ते करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष रजनीताई अनिल वानखेडे, गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, सभापती अनिता राजेश पाटील, उपानगरध्यक्ष प्रकाश नागो देसले, भिला बारकू पाटील, सुभाष माळी,अशोकराव देसले, प्रकाश नाना चौधरी, दयाराम माळी, नगरसेवक अरुण देसले, विनोद पाटील, जितेंद्र जाधव,किसन सकट, चेतन परमार, भाजपा ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष दिपक चौधरी, रेल्वे प्रवासीचे तालुकाध्यक्ष दादा मराठे, शहराध्यक्ष प्रवीण माळी,आर.एच.भामरे, गणेश मराठे, दगा चौधरी, रमेश भामरे, दिनेश सूर्यवंशी, बन्सीलाल बोरसे, मनिषा राकेश चौधरी, आशाबाई भगवान मराठे, सदाशिव पाटील, युवराज माळी, मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे यांसह सर्व नगरसेवक, वि का सोसायची संचालक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन स्विकृत नगरसेवक अरुण देसले यांनी केले. ह्यावेळी आमदार जयकुमार रावल यांनी सांगितले की, शिंदखेडा शहरातील विविध विकास कामांचे नियोजन करून शहर प्रगतीपथावर असून लवकरच पिण्याच्या पाण्याची योजना अंमलात आणुन दिवपालीच्या शुभमुहूर्तावर लोकार्पण सोहळा संपन्न होईल. तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन, पंचायत समिती, सारख्या दिमाखदार इमारत आज शहरातील शोभणीय असे आहे.शिवाय नगरपंचायत माध्यमातून विविध विकास कामे केली आहेत. हयापुढेही राहिलेले कामांचे विकास करून दाखवु, तसेच शिंदखेडा शहरवासीयांना त्यांनी दिलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तसेच गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांनी मतदारसंघातील आमदार जयकुमार रावल यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करताना विविध विकास कामांना गती देण्यासाठी मदत केली असून त्यांचे शहरवासीयांकडुन विशेष आभार मानले.