छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक लवकर बसवावे
विधीपूर्वक स्मारक न बसविल्यास आंदोलन छेडू ; राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष दयाराम कुवर यांची मागणी
दोंडाईचा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत व तमाम हिन्दू धर्मीयांचे आदरस्थान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक नगरपालीका प्रशासकाने त्वरीत बसवावे,अन्यथा स्मारक लवकर न बसल्यास तीव्र आंदोलन छेडावे लागल्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर कार्याध्यक्ष व राष्ट्रमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री दयाराम आत्माराम कुवर यांनी मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांना पक्षाच्या लेटर पॅडवर निवेदन दिले आहे.
यावेळी त्यांच्यासोबत दोंडाईचा वरवाडे नगरपालीकेचे माजी नगराध्यक्ष बापूसाहेब रविंद देशमुख, माजी बांधकाम सभापती भुपेंद्र धनगर, माजी पाणीपुरवठा सभापती दिलीप पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख शैलैश सोनार, घनश्याम राजपूत,ॲड. मुन्ना मराठे, आर.आर.पाटील, आकाश महाजन, बापूजी मिस्तरी, जितेंद्र तिरमले, आदी उपस्थित होते.
यावेळी तक्रार वजा निवेदनाचा विषय असा की, ३०/४० दिवसापूर्वी महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आमचे आदरस्थान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक ट्रक चालकाने धडक दिल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास नुकसान झाले होते. तरी ते स्मारक तीन-चार दिवसात बसविण्या बाबत मनपा प्रशासन तहसीलदार यांनी आश्वासित केले होते. कारण नसताना अवाजवी अतिक्रमण काढून अनेक व्यवसायिकांना बेरोजगार केले. परंतु आमच्या सर्वांचं श्रद्धा स्थान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक अद्याप पावतो सन्मानपूर्वक बसवण्यात आले नाही. तरी त्वरित विधी पूर्वक न बसविण्यात आल्यास आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल. तरी आमच्या भावनांच्या गांभीर्याने विचार करून त्वरीत राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक विधीपूर्वक बसवण्यात यावे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.