Horoscope: आजचे राशीभविष्य, शुक्रवार १७ जून २०२२ !
मेष : नोकरीत बढतीची शक्यता. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
वृषभ : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. काहींना प्रवासाचे योग येतील.
मिथुन : एखादी गुप्त वार्ता समजेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवावीत.
कन्या : संततिसौख्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
तुळ : काही कामे धाडसाने पार पाडाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
वृश्चिक : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. गुरूकृपा लाभेल.
धनु : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
मकर : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
मीन : तुमचे निर्णय योग्य ठरतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.