जवाहर मेडिकल फाउंडेशनमध्ये महिला दिन उत्साहात साजरा
धुळे (करण ठाकरे) महिला ही एकाच वेळी दोन कुटुंबांना पुढे नेत असते. अशावेळी तिच्याकडे असलेली संस्काराची शिदोरी ही खूप महत्वपूर्ण असते. ही शिदोरी जवळ असेल तर निश्चतिच चांगला समाज घडविण्यास हातभार लागेल. त्यामुळे आजच्या महिलांनी आपल्या आईवडीलांच्या अपेक्षा ओळखून वर्तन ठेवावे. असे प्रतिपादन जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या डॉ. ममता पाटील यांनी केले. एसीपीएम मेडिकल कॉलेजमध्ये आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर सहसचिव डॉ. संगिता पाटील, प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, डेंटलचे अधिष्ठाता डॉ. अरूण दोडामनी, वैदयकीय अधिक्षक डॉ. मधुकर पवार, डॉ. दिलीप पाटील, डॉ. आर. सी. शर्मा, डॉ. अलका पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. पाटील पुढे म्हणाल्या की, आयुष्यात चुका नक्की करा परंतु इतक्याही करू नका की पुढे जावून आपल्याला पस्तावल्यासारखे होईल. डॉ. प्रशांत सोळंके यांनी आपल्यामनोगतात आई जिजाउंनी स्वराज्याची स्थापना केली. सर्व जातीपातींना सोबत घेवून स्वराज्याचे तोरण बांधले. महिलांचा सन्मान करतांना त्यांचे कौतुक, प्रोत्साहन केले पाहिजे असे सांगितले. डॉ. मधुकर पवार यांनी आपल्या भाषणात एक दिवस महाविद्यालयाचा सर्व कारभार महिलांच्या हाती देवून महिला दिनी नवा पायंडा रूजवावा अशी सूचना केली. प्रत्येक दिवस महिलांचाच असतो असे सांगितले. डॉ. दिलीप पाटील यांनी आपल्या मनोगतात एक स्त्री खूप शक्तीशाली असते ती कायम पुरूषांना सांभाळण्याचे काम करते. तिची शक्ती अपार आहे. महिलांनी ठरविले तर ते जग बदलू शकतात असे प्रतिपादन शुभेच्छा दिल्या.
भूलतज्ञ डॉ. मानसी पानट यांनीमहिलांविषयी बोलतांना सुंदर विचार मांडले. गझल, कविता, सिनेमाच्या गीतांचा वापर करून त्यांनी महिलांचे भावविश्व उलगडले. महिलांनी आता स्वतःला ओळखले पाहिजे. आपली क्षमता जाणून घेतल्या पाहिजेत असे सांगितले. डॉ. भानुप्रिया पांडे यांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला स्वर्गीय लता मंगेशकर व सिंधूताई सपकाळ यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. डॉ. शाहीन काझी यांनी प्रास्ताविक व स्वागतपर भाषणात सर्व मान्यवरांचा परिचय, व स्वागत केले. याप्रसंगी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. आकांक्षा पाटील यांनी केले. आभार डॉ. प्रांजली शिंदे यांनी मानले. कार्यक्रमासाठी नर्सिंग, मेडिकल, डेंटल कॉलेजचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी माजी मंत्री रोहिदास पाटील, जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भाईदास पाटील, उपाध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील आदींनी शुभेच्छा दिल्या.



