शिऊर येथे सुरू असलेला फिरता नारळी सप्त्याला अर्थमंत्री डॉ भागवत कराड यांनी दिली भेट.
दिनांक – १० आँगस्ट २०२३
वैजापुर प्रतिनिधि- गहनीनाथ वाघ
वैजापूर तालुक्यातील शिऊर मध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री संत शंकर स्वामी महाराज फिरता २७७ वा अखंड हरिनाम सप्ताह आज दिनांक ७ रोजी महादेव महाराज राऊत यांच्या अमृतवाणीतून लाखो भाविकांनी तसेच अर्थमंत्री भागवत कराड यांनी घेतला कीर्तनाचा लाभ कीर्तनाची सांगता झाल्यानंतर भागवत कराड बोलले की मी एक वारकरी घराण्यातील आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आई-वडिलांचे प्रेम मिळते शिकवण मिळते आई-वडिलांमुळे आपण मोठे होतो असे अमृतमय वाणीतून सांगणारे महादेव महाराज राऊत यांनी फार छान कीर्तन केले व लाखो भाविकांना धार्मिकतेचे मार्गदर्शन केले कथेचे श्रवण करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष एकनाथराव जाधव सारंगधर भोपळे दिनेश परदेशी कैलास पवार ज्ञानेश्वर पवार अशोक पवार सुभाष बापू नितीन चुडीवाल सुनील पैठण पगारे अनिल वाणी शिवाजी साळुंखे उपस्थितीत होते.