शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे शाळा शुभारंभ व मोफत पाठ्यपुस्तक वाटप
शिंदखेडा (यादवराव सावंत) तालुक्यातील भडणे येथील कै.सी. बी. देसले विद्यालयात शाळेत 2022/23 या शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला शाळा शुभारंभ, त्याचबरोबर मोफत पाठयपुस्तक पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना, शासनाच्या आदेशानुसार पाठ्यपुस्तकवाटप करण्यात उत्साहात वाटप करण्यात आले. पहिल्या दिवशी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे गावातील मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
दोन वर्षापासून कोरोनामुळे निर्बंध,लादण्यात आले होते त्यामुळे मात्र यावर्षी शासनाच्या आदेशानुसार, तसेच नवगतांचे स्वागत औक्षण करून करण्यात आले सदर प्रसंगी शिंदखेडा येथील शेतकरी बोर्डिंग संचलित,किसान विद्यालय संस्थेचे चेअरमन माजी उपसभापती माजी सरपंच साहेबराव दौलत पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे व संस्थेचे सचिव प्रकाश पाटील यावेळी ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष बबुतराव पाटील तसेच भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी व इतर पालक वर्ग उपस्थित होता. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुलांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. त्याच बरोबर सर्व मुलांना पोषण आहारा सोबत मिठाईचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी मुख्याध्यापक डि जी पाटील कार्यक्रमाचे प्रास्तविक शिंदे यांनी केले. सारंग पाटील, जीवन पाटील, शिंदे अहिरे, वेदे, पाटील, मनोहर पाटील ए,पी. देसले, निलेश पाटील यांनी उत्कृष्टपणे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले