पाचोरा येथे महाराष्ट्र वाणी युवा मंचतर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम उत्साहात साजरा
पाचोरा (प्रतिनिधी) येथे वाणी समाजाचे महाराष्ट्र वाणी युवा मंचकडून सर्व शाळातर्गत इयत्ता ९ व १० वी सन २०२० ते २०२१ या वर्षात उत्तीर्ण होऊन चांगले गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ भडगाव रोडवरील महालपूरे कार्यालयात उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र वाणी युवा मंचचे प्रदेश अध्यक्ष पाचपुते (धुळे) यांच्या हस्ते झाले. तसेच अध्यक्षस्थानी श्रीमती सुंदरबाई सीताराम मालपुरे (लोहटार) हे होते. प्रमुख उपस्थिती विजय रामकृष्ण मालपुरे चेअरमन माध्यमिक विद्यालय, प्रमुख पाहुणे म्हणुन संस्कार वाणी पाचोरा यांचे संस्थापक अध्यक्ष योगेश येवले, उपनगराध्यक्ष शरद पाटे, भाजपा शहराध्यक्ष रमेश मुरलीधर वाणी हे उपस्थित होते. रविवार ५ डिसेंबर २०२१ रोजी आयोजित कार्यक्रमात या मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना, राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक पुरस्कार यांना महाराष्ट्र पे.अ. पुणे कोषाध्यक्ष यादवराव सिनकर बक्षीस वितरण व सत्कार करण्यात आले.
तसेच परिसरातील प्रथम कन्या प्राप्त दाम्पत्यांच्या सत्कार भाजपा शहराध्यक्ष रमेश मुरलीधर वाणी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व या कार्यक्रमाचे आयोजन व उपस्थित राहण्याचे आवाहन कार्याध्यक्ष विशाल ब्राह्मणकर, उपाध्यक्ष अशोक बागड, शाखाध्यक्ष लक्ष्मण सिनकर, खजिनदार विवेक ब्राह्मणकर, तालुकाध्यक्ष किरण अमृतकर, ज्येष्ठ संघटक प्रविण शेंडे, ज्येष्ठ सल्लागार राजेंद्र चिंचोले, संस्थापक शाखाध्यक्ष डी.आर.कोतकर, कार्यकारिणी सदस्य योगेश शेंडे, रमेश महालपूरे, हर्षल माकडे, महेंद्र महालपूरे, संदीप महालपूरे, विजय सोनजे, प्रकाश येवले, सुनील कोतकर, गणेश सिनकर, संजय शेंडे यांनी केले.