शिंदखेडा येथील भिल समाज विकास मंचच्या वतीने वीर एकलव्य जयंती उत्साहात साजरी ; अनेक पदाधिकाऱ्यांनी केले पुजन
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील भिल समाज विकास मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वीर एकलव्य जयंती निमित्त सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांनी वीर एकलव्य हयांच्या प्रतिमेला नमन करून पुजन केले.
पी.एस.आय. गजानन गोटे ,अॅड.अरविंद मंगासे ,उल्हास देशमुख, टेमलाय सरपंच प्रतापआप्पा गिरासे, नगरसेवक उदय देसले, जेष्ठ मार्गदर्शक गणेश सोनवणे, जिल्हा सचिव अशोक सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष बापुजी फुले, नगरसेवक चंद्रकांत सोनवणे,किसन सकट, खजिनदार राजेश मालचे, शामा ठाकरे, भाऊसाहेब मालचे ,राहुल मराठे ,अजय मराठे यासह पदाधिकारी व शहरातील विविध राजकीय पक्षांच्या तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी पुजन करून वीर एकलव्य यांनी समाजातील सर्व घटकांना व देशासाठी दिलेल्या योगदानाचा आदर करतो. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांनी सांगितले की. वीर एकलव्य हे भिल समाजातील भुषण आहे. आज महाशिवरात्री हया दिवशी महादेवाची पुजा केली जाते. भिल समाज हा महादेवाला समाज आहे. वीर एकलव्य हे आमचे देव आहेत.त्यांनी दिलेले योगदान हे आजच्या तरुणाईला प्रेरक आहे.त्यांचा आदर्श समोर ठेवून वाटचाल करीत समाजात शिक्षण . व्यसनमुक्त हयाविषयी जनजागृती करावी. हयाप्रसंगी दिपक अहिरे, गणेश सोनवणे, बापुजी फुले. राजेश मालचे ,चंद्रकांत सोनवणे, शामा ठाकरे ,कालु मोरे , किरण चित्ते ,भरत पाटील ,आदीसह समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.