मेळघाट व्याघ्र प्रकल्पामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रम
अमरावती (पंकज मालवीय) मेळघाट व्याघ्र प्रकल्पामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पामार्फत ८ मार्च या जागतिक महिला दिनानिमित आकोट वन्यजीव विभागातील शहानुर येथे मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये कार्यरत महिला क्षेत्रीय वनकर्मचारी यांच्यांकरिता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचा विषय होता, वनक्षेत्रात कार्य करतांना विविध माध्यमातून व छंद जोपासून आनंदी वृत्ती वाढविणे व मानसिक ताण-तणावाचे व्यवस्थापन करणे आणि महिलांचे आरोग्य, व्यक्तिमत्व विकास या विषयावर ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या शिवाय वनक्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला वनकर्मचारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच या क्षेत्रीय महिला कर्मचारी यांना वेळोवेळी पाढबळ देणाऱ्या वन अधिकारी व कर्मचारी यांच्या ही सन्मान करण्यात आला सोबतच काही निवडक महिलांना उर्जा देणाऱ्या माहिती पटसुद्धा दाखविण्यात आले.
महिलांचे आरोग्य व व्यक्तिमत्व विकास या विषयावर डॉ. संगीता लोखंडे, आकोट यांनी विस्तीर्ण स्वरुपात महिलांना मार्गदर्शन केले, त्यांचे प्रश्न समजून त्यांना योग्य स्वरुपात आरोग्यांच्या विविध महत्वाच्या बाबी समजवून सांगितल्या तर happines index या विषयावर प्रफुल्ल सावरकर (उपजीविका तज्ञ) मेळघाट व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान यांनी मार्गदर्शन केले.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सर्व विभागातील निवडक क्षेत्रीय स्थरावर उत्तम कार्य करण्याऱ्या महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रम मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक जयोती बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली झाला तर अकोट वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक नवाकिशोर रेड्डी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्तविक मांडणी केली. सिपना वन्यजीव विभागाच्या उपवन संरक्षक दिव्या भारती यांनी महिला कर्मचारी यांच्यांशी त्यांचा महत्वाच्या विविध विषयावर चर्चा करून त्यांना प्रोत्साहित केले. गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक सुमंत सोळंके यांनी ही सर्व सहभागी महिला वनकर्मचारी यांना महिलांचे कार्य या विषयी उत्तमरित्या समजून सांगितले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन घटांग वनपरिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्राची बिसेन यांनी केले.
हा कार्यकम यशस्वी होण्याकरिता मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी एम.एन. खैरनार यांनी मोलाची भूमिका बजावली. सदर कार्यक्रमाला सिपना वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक कमलेश पाटील, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वन परिक्षेत्र अधिकारी योगेश तापस व श्रद्धा जयस्वाल सोनाळा वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे व रायपुर परिक्षेत्राचे अनिल शेलार उपस्थित होते. सदर कार्यक्रमच्या यशस्वीतेकरिता आकोट वन्यजीव विभागाच्या चमूने अथक मेहनत घेतली तर पर्यटन अधिकारी स्वप्नील बांगडे यांनी सुद्धा मोलाची भूमिका बजावली.



