मुंबई – आग्रा महामार्गावर मारुती सुझुकी वाहनांचे शोरुम चोरट्यांनी फोडले
धुळे (विक्की आहिरे) शहरासह जिल्हाभरात चोरी, घरफोड्यांचे सत्र सुरु झाले आहे. मुंबई- आग्रा महामार्गावर पुन्हा एकदा वाहनांचे शोरुम चोरट्यांनी फोडले. मोकळ्या जागेतून शोरुममध्ये उडी मारुन शिरलेल्या चोरट्यांनी अवघ्या आठ मिनिटात तिजोरीसह सुमारे तीन लाख ६ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
मुंबई – आग्रा महामार्गावर अवधान शिवारात अपना हॉटेलनजीक मारुती सुझुकीचे सेवा ऑटोमोटीव्ह नावाचे शोरुम आहे. चोरट्यांनी दि. १६ पहाटे २ ते ३. १५ वाजेच्या दरम्यान अज्ञात तीन चोरट्यांनी शोरुमच्या शेजारील मोकळ्या जागेतून उडी मारुन आत प्रवेश केला आणि काचेच्या कॅबिनमधील लोखंडी तिजोरी तोडून चोरून नेली. अवघ्या आठ मिनिटात ही चोरी झाली. यात तिजोरीसह त्यातील रोकड मिळून ३ लाख ६ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. सकाळी शोरुमचे कर्मचारी कामावर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक दिनकर पिंगळे, मोहाडी पोलिस ठाण्याचेमिळताच पोलिस उपअधीक्षक दिनकर पिंगळे, मोहाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. शोरुमचे सीसीटीव्ही तपासले असता त्यात चोरीचा घटना कैद झाल्याचे आढळून आले. यात तीन चोरटे दिसून आले आहेत. याप्रकरणी कॅशिअर भिला हिलाल पाटील यांनी मोहाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द भादंवी कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



