महाराष्ट्रराजकीय
शाळा-महाविद्यालयाबाबत परिस्थिती पाहून लवकरच निर्णय घेतला जाईल ; आदित्य ठाकरेंचे सूचक वक्तव्य
मुंबई (प्रतिनिधी) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील कोरोना व्हायरसच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी शाळा- कॉलेजच्या परिस्थितीवर पुन्हा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे म्हटले आहे.
ते म्हणाले की,’सध्याची परिस्थिती ही गंभीर नसली तरी कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येकानेच काळजी घेतली पाहिजे. गर्दी टाळणे आणि मास्कचा वापर प्रत्येकासाठी अनिवार्य आहे.सध्या नाताळनिमित्त शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या आहेत. मात्र पुढील काळात शाळा,महाविद्यालये सुरू ठेवायचे की नाही?याचा निर्णय परिस्थिती पाहून घेण्यात येईल’ असे आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारंभात सन्माननीय उपस्थिती म्हणून त्यांनी हजेरी लावली होती यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे भाष्य केले आहे.