सर्व सामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्यास बळी पडू नका ; खान्देश रक्षक ग्रुपचे पीआय यांना निवेदन
शिंदखेडा (यादवराव सावंत) भारतीय सेनेची वर्दी घालुन भारतीय सेनेत नोकरीचे आमिष दाखवून मनोज जाधव उर्फ दिपक बडगुजर या व्यक्तीने भारतीय सेनेची वर्दीचा गैर वापर करून भारतीय सेनेचा अधिकारी असल्याचे भासवत, मु. पो.अनरद तालुका शाहदा जिल्हा नंदुरबार येथील सर्व सामान्य हातमजूरी करणाऱ्या कैलास नामदेव माळी आणि त्यांचा मुलगा राज माळी यांची फसवनुक करत ३ लाख रुपये लुटलेत सदर व्यक्ति गाव व नाव खोटे सांगत आहे.
खान्देश रक्षक ग्रुप व खान्देश रक्षक आजी माजी सैनिक संस्था ह्या नावाने कोणी नोकरीचे आमिष दाखवत असेल तर अशा फसवेगिरीला कुणी बळी पडू नये तसेच सदर व्यक्ति मनोज जाधव उर्फ दिपक बडगुजर याच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि जनतेने सावध राहावे, या आशयाचे निवेदन खान्देश रक्षक ग्रुप शिंदखेड़ा, तालुकाचे पदाधिकाऱ्यांच्या वतीने शिंदखेड़ा पोलिस स्टेशनचे पी आय भाबड यांना देण्यात आले.
यावेळी खान्देशी रक्षक संस्थेचे सर्व पदाधिकारी माजी सैनिक ज्ञानेश्वर गिरासे, प्रमोद बोरसे, संजीव नगराळे, देविदास कोळी, भावासिंग गिरासे, बाबूलाल जगदाळे, भूषण पवार उपस्थित होते.