चोपडा येथे आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाकडून बॅनर लावून विद्यार्थ्यांसोबत चर्चा
चोपडा (विश्वास वाडे) महाविकास आघाडी सरकारच्या विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकामुळे राज्यातील विद्यापीठांची स्वायत्तता संपुष्टात येऊन विद्यापीठे राजकारणाचा अड्डा बनतील आणि शिक्षणाच्या दर्जा घसरून युवा वर्गाचे कायमस्वरूपी नुकसान होईल .राज्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात आणणारा हे काळे विधेयक असून राजकीय स्वार्थासाठी विद्यापीठाच्या कामात हस्तक्षेप करण्याच्या आघाडी सरकारच्या विरोधात कला शास्त्र व महाविद्यालय चोपडा येथे युवा मोर्चाकडून बॅनर लावून विद्यार्थ्यांना विषयासंबंधी चर्चा केली व का विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी मिस कॉल देण्याचे आवाहन केले.
यावेळी खासदार रक्षाताई खडसे, भाजपा नेते शांताराम पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष पंकज पाटील, राकेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शहराध्यक्ष गजेंद्र जेस्वाल, गजेंद्र सोनवणे, जि.प. युवा मोर्चा अध्यक्ष प्रकाश पाटील, युवा मोर्चा शहर सागर चौधरी, हनुमंत महाजन, तालुका सरचिटणीस हेमंत जोहरी, तुषार पाठक, मनोहर बडगुजर, कमलताई चौधरी, जिल्हा उपाध्यक्षा महिला सिमा सोनार, शहर उपाध्यक्षा अरुणा पाटील, शहर उपाध्यक्षा ओबीसी मोर्चा यावेळी उपस्थित होते.
महिलांच्या सत्कार खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच राज्य परीषद सदस्य अनिल पाटील, आबा चैधरी, नामदेव बाविस्कर, सरपंच रणछोड पाटील, रविंद्र मराठे, मनोज सनेर, पंकज पाटील, मिलिंद पाटील, मंगल बा, अमित तडवी, दिनेश पाटील, सुनील सोनगिरे, गोपाल पाटील, सुरेश चौधरी, कांतिलाल योगराज जाधव, विवेक गुजर, मोहित भावें, प्रविण चौधरी, भैय्या सोनवणे व आदि विद्यार्थी उपस्थित होते.