महाराष्ट्र

नामपुर बस स्थानकासमोरील कृष्णाई व्यापारी संकुलला भीषण आग

सटाणा (संभाजी सावंत) नामपूर येथील कृष्णाई संकुल मधील बिकानेर स्वीटला पहाटे अचानक आग लागल्याने दुसऱ्या मजल्यावरील जोशी हॉस्पिटलचे डॉ जोशी यांना खालून धूर व आगीचा दाह लक्षात येताच त्यांनी व्यापाऱ्यांना सतर्क केल्याने मोठी हानी टळली. आग इतकी भयानक होती की बिकानेर स्वीट व शेजारील राशी मेडिकल हे पूर्णपणे जाळून खाक झाले.

तसेच स्वीट मार्टचे व मेडिकलचे फर्निचर व मालाची फक्त राखच शिल्लक राहिली असून अंदाजे ५० ते ६० लाखाचे नुकसान झाल्याचे समजते. आगीचे वृत्त परिसरात पसरताच नागरिकांनी गर्दी करुन वेळीच आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्याने अनर्थ टळला. आगीचे मुख्य कारण समजले नसून शॉक सर्किटने आग लागण्याच्या प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. अग्निशामक दलाला पाचारण होण्यास तब्बल दीड ते दोन तास उशीर झाल्याने त्यांनी नामपूर सटाणा खराब रस्त्याचे कारण देत उशीर झाल्याचे सांगितले. मुख्यतः कुपखेडे ते नामपूर रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे म्हणून सर्व पक्षीय कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे