राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते भराडी सर्कल मधील विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न
सिल्लोड (विवेक महाजन) महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते भराडी जि.प. सर्कल मधील विविध गावातील विकास कामांचे भूमिपूजन तसेच शिवसेना, युवासेना व महिला आघाडी शाखा नामफलकाचे अनावरण रविवार रोजी संपन्न झाले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, जि.प. माजी अध्यक्ष श्रीराम पा. महाजन, जि.प. माजी उपाध्यक्ष केशवराव पा. तायडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, प.स.सभापती डॉ. संजय जामकर, उपसभापती काकासाहेब राकडे, पंचायत समिती सदस्य सत्तार बागवान, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, मतदारसंघ संघटक सुदर्शन अग्रवाल, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, सयाजी वाघ, मारुती पा. वराडे, नगरसेवक विठ्ठल सपकाळ यांच्यासह शिवाप्पा गौर , संजय राकडे, अब्दुल रहीम, धनजी पा. गोंगे, नानासाहेब राकडे, राजुमिया देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
भराडी सर्कल मधील पीरोळा येथे गावात पेव्हर ब्लॉक व पथदिवे बसविणे 15 लाख, डोईफोडा येथे फुले वस्तीत नलकांडी पुलासह रस्ता व गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे 13 लाख, सावखेडा खुर्द येथे गावांतर्गत रस्ते करणे 20 लाख, सावखेडा बुद्रुक येथे स्मशानभूमी बांधकाम व संरक्षण भिंत बांधकाम करणे तसेच रामा 51 ते सावखेडा बुद्रुक रत्याची सुधारणा करणे 50 लाख तर धामणी येथे मंदिर समोर पेव्हर ब्लॉक व गावांतर्गत पथदिवे बसविणे 18 लाख असे एकूण 1 कोटी 16 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले.
विविध गावांत संपन्न झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमास रवींद्र काळे, डॉ. एन.टी. काळे, अनिल काळे, तुकाराम काळे, संजय काळे, युवराज काळे, विनायक बिडवे, शाम अकोलकर, काशीनाथ अकोलकर, सोमिनाथ अकोलकर, दीपक अकोलकर, अंबादास बाविस्कर, गंगाबाई सोन्ने, रेखाबाई सोन्ने, सायनाबाई खंडाळकर, प्रताप शेळके, कृष्णा सोन्ने , कैलास सोन्ने, सुखदेव निंबाळकर, एकनाथ शेळके, जितेंद्र तांबे, पुंडलिक गोंगे, प्रा गोविंदराव भोजने, पंडीत गोरे, मधुकर गोंगे, गणेश मारुती गोंगे, गणपत गोरे, बाळा पांढरे, समाधान पा गोंगे, लक्ष्मण गोरे, रघुनाथ तांबे, बालू गोरे, संतोष गोंगे, नाना गोंगे, अजिनाथ गोरे,भीमराव राकडे, गिरीधर भोजने, गंगाधर गोंगे, लक्ष्मण गोंगे, नारायण गोंगे, विजय गोंगे, सचिन गोंगे, नवनाथ राकडे, सुखदेव शेळके, नाधोराव लांडगे, सुखदेव सिरसाट, लक्ष्मण वाघ, प्रभाकर सिरसाट, दाऊत पटेल, गोविंद सिरसाट, महंमद पटेल, पांडुरंग लांडगे, नजीर पटेल आदींसह गावकऱ्यांची उपस्थिती होती.