बोदवड तालुक्यातील जलचक्र येथे खडसे समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश
बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील जलचक्र येथील खडसे समर्थकांचा आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. यावेळी मयुर शिवाजी पाटिल यांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ईश्वर शेळके, पंडित घुले, अजय पाटिल, अक्षय पाटिल ,भारत पाटिल यांनी आमदार चंद्रकांत भाऊ पाटिल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रवेश केला. यावेळी बंटी पाटिल, धनराज पाटिल, नितीन पाटील, मुकेश बरडे, गणेश धांडे, रमजान मुलतानी, फिरोज मुलतानी, अय्युब मुलतानी, निसार मुलतानी ग्रामस्थ ऊपस्थित होते. जलचक्र हे खडसे समर्थक जि.प. सदस्याचे गाव आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ येत्या काही दिवसांत पुर्ण होत आहे. तरी येत्या जि.प. व पंचायत समिती निवडणुकीच्या संभाव्य उमेदवारांची चर्चा होत असतांना खडसे गटाला हा धक्का मानण्यात येत आहे. बोदवड नगरपंचायतीचा एतिहासिक विजय संपादन केल्यानंतर शिवसेनेची आता ग्रामीण भागामध्येही पाय रुजवण्यास सुरूवात झाली आहे.

यावेळी आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांच्यासोबत शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनिल पाटील, तालुकाप्रमुख छोटुभाऊ भोई, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अफसरभाई खान, बोदवड नगराध्यक्ष आनंदा पाटिल, माजी नगराध्यक्ष सईद बागवान, माजी ऊपनगराध्यक्ष तथा नगरसेवक दिनेश माळी, माजी ऊपनगराध्यक्ष तथा नगरसेवक नितीन चव्हाण, नगरसेवक सुनिल बोरसे, शहरप्रमुख तथा नगरसेवक हर्षल बडगुजर, नगरसेवक निलेश माळी, नगरसेवक गोलुभाऊ बरडिया, माजी नगरसेवक देवेंद्र खेवलकर यांच्यासमवेत शिवसैनिक उपस्थित होते.



