वीर सैनिक ग्रुप देगलुरच्या वतीने भारतीय सैनिक सुभेदार संतोष केंचे यांचे भव्य स्वागत सत्कार
देगलूर : सुभेदार संतोष बाबुराव केंचे रा. शेवाळा ता देगलूर येथील भूमिपुत्र आपल्या जीवनातील 26 वर्ष भारत मातेची सेवा करून दि.11 एप्रिल रोजी जन्मभूमीत सुखरूप परत आले.
सर्व प्रथम परमवीर चक्र विजेता शहीद हवालदार अब्दुल हमीद यांच्या देगलुर येथील स्मारकास सूबेदार संतोष केंचे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर वीर सैनिक ग्रुप देगलूर च्या वतीने जे सेवारथ सैनिक सुट्टीवर आहेत व त्यांच्या मित्रमंडळींनी भारतीय सैन्य सेवा निवृत्त सुभेदार संतोष बाबुराव केंचे व आई वडिल त्यांच्या पत्नी, मुलांचे भव्य स्वागत सत्कार करण्यात आले.
त्याच बरोबर देगलूर येथील सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. रवि काळे आणि अतुल ठाणेकर व मित्रमंडळींनी त्यांना माऊली हास्पिटल येथे बोलावून हास्पिटल मध्ये मान-सम्मान देऊन सत्कार करण्यात आले.
त्यावेळी ते म्हणाले सैनिकामूळेच आज आपला देश सुरक्षित आहे नाहीतर रशिया आणि युक्रेन यूध्दात युक्रेन च्या सामान्य नागरिकांचे हाल जगासमोर आहे.
भारतीय सैनिक आपल्या देशाची आतंरिक आणि सीमा सुरक्षा चोख बजावत आहेत त्यामुळेच आज आपण सर्व जण सुरक्षित आहोत. या शुभ कार्य प्रसंगी वीर सैनिक ग्रुपचे – शाम आइनलवार, ईरवंत भंडरवार, संदीप ईबितवार, अक्षय काबळे, आणि कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करण्यात दत्तात्रय मैलागिरे, रुपेश बतलवाड व मित्रमंडळींनी या सर्वाँचे महत्वपुर्ण योगदान आहे असे प्रतिपादन शाम आइनलवार यांनी केले.