मालपुर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आघाडीचे प्रकाश पाटील
मालपुर : मालपुर विविध कार्यकारी सोसायटीवर महाविकास आघाडीचे प्रकाश (तात्या) पाटील चेअरमन व भाजप कडुन सुरेखा बाई लोटन इंदवे व्हाईस चेअरमनपदी सर्वांनामते बिनविरोध निवड करण्यात आली.
मालपुर ता.शिंदखेडा.जि.धुळे येथे विविध कार्यकारी सोसायटीवर संचालक मंडळाकडून चेअरमन व व्हा चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली व सर्व 13 संचालक उपस्थित होते. सकाळी ठिक 11 वाजता सोसायटी येथे निवड प्रक्रिया पार पाडण्यांत आली. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. व नवनिर्वाचित चेअरमन व व्हा चेअरमन यांच्या सोसायटी च्या आवारात सत्कार करण्यांत आला व महावीर सिंह रावल (जिल्हा परिषद सदस्य धुळे), रविंद्र दादा पाटील (ग्रा.पं. सदस्य), हेमराज नाना पाटील (सरपंच तथा जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी), सदाशिव गोसावी (उपसभापती पं. स. शिंदखेडा) संजय पाटील दादाभाई इंदवे जयवंतराव पाटील, (युवा नेते काँग्रेस) कैलास आप्पा पाटील, आसाराम आप्पा भामरे, भरत माळी, दामोदर अहिरे उमेश गोराणे राजेंद्र आखडमल सुनिल चव्हाण सुनील कोळी (आण्णा भाऊ) उपसरपंच अरूण धनगर, उपसरपंच मालपुर सोसायटीचे सचिव रवींद्र पाठक व निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यांनी काम पाहिले गिरीश महाले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने व पत्रकार बंधु उपस्थित होते.