महाराष्ट्र
मालपुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम निकृष्ट दर्जाचे
मालपुर (गोपाल कोळी) मालपुर ता.शिंदखेडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे नविन इमारत बांधकाम सुरू आहे ते निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे. माती मिश्रीत वाळु वापरली जात आहे जिल्हा परिषद बांधकाम विभागमार्फत हे काम चालू आहे. सदर हे काम ६.५० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत आहेत. तरी अधिकारी लोकांचे दुर्लक्ष होत आहे. लवकरात लवकर संबंधीत दखल घेण्यात यावी अशी मागणी मालपुर ग्रामस्थांची केली आहे.