महाराष्ट्र
वंचित बहुजन आघाडीचा कोर्हाडा रोहीणखेड सर्कल मेळावा संपन्न
मोताळा (संभाजी गवळी) वंचित बहुजन आघाडीचा कोर्हाडा रोहिणखेड सर्कल मेळावा ग्राम रोहिंनखेड येथे आयोजित करण्यात आला होता. तरी मेळाव्याला मुख्य मार्गदर्शक म्हणून बुलडाणा जिल्हयाचे जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे हे होते. त्याच प्रमाणे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव शिरसाट, तालुका अध्यक्ष युवराज भिडे, तालुका उपाध्यक्ष समाधान डोंगरे, तालुका सचिव संजय खराटे, आणि इतर सहकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष युवराज भिडे यांनी केले.