राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
गरजूंनी लाभ घ्यावा ; आयोजकांच्या वतीने करण्यात आले अवाहन
सिल्लोड (प्रतिनिधी) महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिल्लोड नगर परिषद, उपजिल्हा रुग्णालय , जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व कृत्रिम भिंगारोपन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळ, शिवसेना, युवासेना व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या शिबिरा अंतर्गत दि. २३ व ३० डिसेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालयात सकाळी ९ वाजेपासून नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. तसेच तपासणी अंती शस्त्रक्रियासाठी निवडण्यात आलेल्या रुग्णांवर ३१ डिसेंम्बर रोजी नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तर १ जानेवारी रोजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मोफत औषधोपचार ,ब्लँकेट व काळे चष्म्याचे वाटप करण्यात येणार आहे. नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मोफत जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.