खा. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागातर्फे फळे व ब्लॅंकेटचे वाटप
अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांचा ८१ वा वाढदिवस नुकताच अमळनेर परिसरात साजरा करण्यात आला. त्याअनुषंगाने राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागातर्फे रुग्णांना फळे व गरजूंना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
खा.पवारांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर स्वाभिमान सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या स्वाभिमानी सप्ताहात महाराष्ट्रात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. अमळनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याकतर्फे ग्रामीण रुग्णालयात फळे व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते रुग्णांना फळे व ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. यावेळी जळगाव जिल्हा अल्पसंख्यांकाचे चिटणीस एजाज अब्दुल गफ्फार मलिक, अल्पसंख्यांकांचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, जिल्हा उपाध्यक्ष अलाउद्दीन शेख चिरागोदिन, मार्केटच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, रिता बाविस्कर, शिवाजी पाटील, पदवीधर मतदार संघाचे कार्याध्यक्ष संजय सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष लतीफ पठाण, मंडळाचे सरपंच नारायण कोळी, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, अभीद शेख, वसीम पठाण, बाबू शेख, रफिक शेख, मुशीर शेख, सैय्यद शाह यांनी परिश्रम घेतले.