महाराष्ट्र
गोळवाडी येथे श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सोहळ्याची सांगता
वैजापूर (गहिनीनाथ वाघ) गोळवाडी येथे चालू असलेल्या श्री हनुमान मंदिर ओंकारेश्वर मंदिर वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह चालू होता. आज हरी भक्त पारायण रामगिरी महाराज सरला बेट यांच्या अमृतमय वाणीतून कीर्तनामध्ये श्रीकृष्ण रासलीला कशाप्रकारे घडल्या याची कथा सांगून चालू असलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा व महाप्रसाद घेतल्यानंतर आज सांगता झाली. किर्तनाचा लाभ घेण्यासाठी वैजापूर तालुक्यातील संपूर्ण आजी-माजी लोकप्रतिनिधी आले होते.