महाराष्ट्रराजकीय

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आज जिल्हा दौऱ्यावर

जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे.

सोमवार, दिनांक २० डिसेंबर, २०२१ सकाळी ०७:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून खाजगी विमानाने जळगावकडे प्रयाण. सकाळी ०८.५०वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व चोपड्याकडे प्रयाण. सकाळी १०.०० वाजता चोपडा येथे आगमन व चोपडा नगरपरिषद आयोजित सुवर्ण महाराष्ट्र जयंती नगरोत्थान महाअभियानातंर्गत चोपडा शहरात नवीन पाणीपुरवठा योजना उद्घाटन समारंभ. दुपारी १२.०० ते १.०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस मेळावा. दुपारी १.०० ते १.३०अरुणभाई गुजराती, माजी विधानसभा अध्यक्ष यांच्या निवासस्थानी राखीव. १:४५ते २.१५ वाजता चोपडा तालुका सहकारी सूतगिरणी जिनिंग व प्रेसिंग प्रकल्पाचे भूमिपुजन.

दुपारी २.१५ वाजता चोपडा येथून जळगावकडे प्रयाण. ३.१५ वाजता जळगाव येथे आगमन. ३.१५ ते ४.०० पर्यंत पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या नवीन निवासस्थान इमारतीचे उद्घाटन. ४.००ते ५.०० पर्यंत नाशिक परिक्षेत्र अंतर्गत कायदा व सुव्यवस्था व इतर विषयांच्या अनुषंगाने विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांच्यासमवेत बैठक. ५.०० ते ६.३० पर्यंत अजिंठा विश्रामगृह येथे राखीव. ६.३०वाजता जळगाव विमानतळाकडे प्रयाण व ६.४५ वाजता आगमन. ७.०० वाजता खाजगी विमानाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे प्रयाण.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे