महाराष्ट्र
भारतीय जनता पार्टी नगरपंचायत निवाडाणुकीसाठी ४७ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
विवेक महाजन : तालुका प्रतिनिधी
सोयगाव : येथे आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री लोकनेते मा.ना.खा.श्री. रावसाहेब पा.दानवे यांच्या आदेशानुसार प्रदेश कार्यकारणी सदस्य मा.सुरेश पा.बनकर, प्रदेश चिटणीस मा.इद्रीसजी मुलतानी,सिल्लोड भाजपा ता.अध्यक्ष मा.ज्ञानेश्वर मोठे,यांच्या मार्गदर्शनाखाली महीला मोर्चा जिल्हा अध्यक्ष सौ.पुष्पाताई काळे, व सोयगाव भाजपा ता.अध्यक्ष मा.गणेश पा.लोखंडे,मा.नगराध्य्क्ष कैलास काळे,शहराध्यक्ष सुनील ठोंबरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी होणाऱ्या नगर पंचायत निवडणुकीसाठी 47 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.आगामी नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर योग्य उमेदवारांची चाचपणी करून उमेदवारी जाहीर करण्यात येईल आणि या निवडणुकीत भाजपा चा झेंडा निश्चित फडकावला जाईल अशी माहिती ता.अध्यक्ष मा.गणेश पा.लोखंडे यांनी दिली.