शिक्षक सेनेकडून देगलूर शिवसेना सचिवपदी धनाजी जोशी यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
देगलूर (प्रतिनिधी) शिक्षक सेनेकडून देगलूर शिवसेना सचिवपदी धनाजी जोशी यांची नियुक्ती करण्यात आल्याने शिक्षक सेनेकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना देगलूर तालुका प्रमुख महेश पाटील, बाबुराव मिनकीकर, शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी, युवासेना उपशहरप्रमुख विनोद सोनकांबळे, श्रीराम शिक्षक पतसंस्थेचे शिवसेना प्रणित शिक्षक सेनेचे नवनिर्वाचित संचालक मनोहर भंडेवारसर, सुवर्णकार व तसेच शितल इरवंतराव भालेराव शेवाळकर, शिक्षकसेनेचे पदाधिकारी एस. वाय. पाटील, विठ्ठल देशटवार पुरुषोत्तम मोतेवार, श्रीरंग बिरादार, विजय अन्नमवार, नामदेव बिरादार, विनोद सुरनर, हाणमंत वल्लेमवाडसर, लक्ष्मण सिंगनवाडसर, शंकर बल्लाळसर, हाणमंत ढवळे, रामचंद्र डामरंचे, राहुल सोनकांबळे, सुनिल कांबळे आदी उपस्थितीत होते. सत्कार कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अविनाश चिद्रावार यांनी केले. आभार प्रदर्शन सुवर्णकार यांनी केले यावेळी शिक्षक सेनेचे तालुका अध्यक्ष एस.वाय पाटील, विजयी उमेदवार भंडेवार यांनी मनोगत व्यक्त केले.



