दोंडाईचा येथील चर्मकार समाज संघटना कार्यकारणी जाहीर
समाजाचे संत शिरोमणी गुरू रविदास स्मारक-चर्मकार वाडा येथे बैठक संपन्न
दोंडाईचा (प्रतिनिधी) शहर चर्मकार समाज संघटना कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. यात अध्यक्ष अजय विसावे, उपाध्यक्ष निलेश विसावे, कार्याध्यक्ष भिकान अहिरे यांची निवड झाली. संत शिरोमणी गुरू रविदास स्मारक, चर्मकार वाडा येथे मावळते अध्यक्ष देवेंद्र अहीरे यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक घेण्यात आली होती. त्यात पुढील वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.
ती पुढीलप्रमाणे-त्यात यावेळी संघटना अध्यक्षपदी अजय सुभाष विसावे, उपाध्यक्ष निलेश दिनेश विसावे, कार्याध्यक्ष भिकन नागो अहिरे, कोषाध्यक्ष देवेंद्र दौलत अहिरे, सचिव प्रकाश अहिरे, सहसचिव छगन मोरे व अविनाश बागले यांची निवड करण्यात आली आहे. तर ज्येष्ठ सल्लागार समितीवर संजय बोरसे, डॉ. निंबा वाल्हे, प्रा. सदानंद वानखेडे, राजन मोरे, विशाल जाधव, संजय बागले, वसंत बागले, घनश्याम अहिरे, आदींची निवड झाली. तसेच यावेळी बैठकीत मोठ्या संख्येने चर्मकार समाज बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन राजन मोरे यांनी केले.