महाराष्ट्र
बोरद येथे महाराणा प्रताप जयंती साजरी ; ग्रामपंचायतीला दिली शवपेटी भेट !
बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद येथे महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रेमसिंग रजेसिंग राजपुत यांनी वडील रजेसिंग डोंगरसिंग राजपुत यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ बोरद ग्रामपंचायतीला शवपेटी भेट दिली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य अनिल राजपुत, रामेश्वर राजपुत, नरेंद्र राजपुत, कैलास राजपुत, पिंटू पाटील, खुशाल पाटील, संदीप राजपुत, विकास राजपुत, घनशाम पाटील उपस्थिती होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यात विजय राजपुत, नथेसिंग राजपूत, सुभाष राजपुत, गुलाब सिंग राजपुत, माजी जिल्हा परिषदेचे सभापती नरहर ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वरसाळे, बळीराम ठाकरे, जितू पाटील, अजय राजपुत आदी उपस्थित होते.