ब्रेकिंग
श्री साईबाबा सस्थांन व साईबाबा ऊत्सव समितीच्या वतीने दत्तु महाजन यांचा सत्कार
बोदवड (सतिष बाविस्कर) बोदवड तालुक्यातील प्रसिद्ध असलेले देवस्थान साईबाबा मंदिर येवती येथे बोदवड तालुक्यातील व इतर जिल्ह्यातील भावी भक्त देव दर्शनासाठी येत असतात. दर गुरुवारी दुपारी १२ वाजता महाआरती व महाप्रसाद श्री साई बाबा मंदिर येवती जामठी बोदवड रोडवर पंचक्रोशित ग्रामस्थ यांच्या सहकार्याने साईबाबांची आरती व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. आज दत्तु भगवान महाजन (रा.येवती) यांनी साईबाबा चरणी सेवा अर्पण केली.
तसेच श्री साईबाबा सस्थांन व साईबाबा ऊत्सव समितीच्या वतीने दत्तु भगवान महाजन यांचा साईबाबा प्रतिमा, श्रीफळ भेट देऊन सत्कार करण्यात आला.