हितेंद्र क्षत्रिय यांचा ग्रामीण भागातील आंबेडकर जनतेकडून सत्कार
बोरद (योगेश गोसावी) तळोदा शहरात महामानव,विश्वरत्न डॉ.बाबासाहेेब भिमराव आंबेडकर यांच्या साठी अनुयायांसाठी तसेच तळोदा शहरातील जनतेला प्रेरणा मिळावी. या उद्देशाने पुतळ्यासाठी सन्मानजनक अशी जागा उपलब्ध करून डॉ बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा ह्या साठी नगरपलिकेत नगरसेवक तथा बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय एका निवेदनाद्वारे मागणी केल्याच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील बोरद, सिलिंगपूर, मोड, खरवड, धानोरा, चौगांव येथील आंबेडकरी बांधवानी तळोदा नगरपालिकेचे बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय यांच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला व या मागणीसाठी त्यांचे आभार ही व्यक्त करण्यात आले.
यावेळी त्यांच्यासोबत योगेश मराठे शहराध्यक्ष रा.कॉं.पा.तळोदा, धर्मराज पवार खजिनदार रा.कॉं.पा.तळोदा, राहुल पाडवी संघटक रा.कॉ.पा.तळोदा हे उपस्थित होते. या वेळी ग्रामीण भागातील बोरद येथून कुणाल पाडवी, गणेश भामरे, भटू मोहिते, दीपक ढोडरे, कन्हैयालाल कुवर, आकाश कुवर, सुनील भामरे, अजय पाटोळे, मिलींद ढोडरे, दिपक केदार, सोमनाथ बिरारे, रतीलाल बागुल, दीपक भामरे, राहुल बिरारे, रुपेश ढोडरे, कल्पेश ढोडरे, प्रशांत सोनवणे, चूडामण ढोडरे, प्रीतम ढोडरे, राहुल साळवे, विनोद भामरे, स्वप्नील कुवर व सर्व भीम योद्धा बी बॉईज ग्रुप हे तर सिलिंगपूर येथून सागर बागुल, अनिल बागुल, चौगाव. मयूर पिंपळे, सिद्धार्थ पिंपळे, छोटा धनपूर. विशाल सामुद्रे हे उपस्थित होते. खरवड येथून यशवंत जावरे, योगेश शिरसाठ, तर खेडले येथून
विनोद बागुल. हे तर धानोरा येथून रवींद्र साळवे, विजय साळवे, सर्व उपस्थीत होते.