शिंदखेडा रेल्वे स्थानकावर उर्वरित जलद गाड्यांना थांबा मिळावा यासाठी भाजपा रेल्वे प्रवासी आघाडीची मागणी – दादा मराठे
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील दोन किमी अंतरावर असणाऱ्या शिंदखेडा रेल्वे स्थानकावर अति जलद गाड्यांना थांबा मिळावा यासाठी शिंदखेडा भाजपा रेल्वे प्रवासी आघाडीचे तालुकाध्यक्ष गोविंद दादा मराठे यांच्या नेतृत्वात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन दिले होते. मात्र काही गाड्यांना अद्यापही थांबा मिळाला नसल्याने प्रवाशामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
शिंदखेडा शहरापासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे स्थानक आहे. शहरासह तालुक्यातील बहुसंख्य व्यापारी व व्यावसायिक या रेल्वेच्या प्रवाशांची नाड जुडलेली आहे. मध्यंतरीच्या कोरोणा महामारीच्या काळात बहुतेक साध्या व जलद गतीने धावणाऱ्या रेल्वे बंद पडल्या. कोरोणा संकटातुन व्यापारी व सर्व सामान्य प्रवासी सावरत असतांना जलद गाड्या बंद असल्याने प्रवाशांना अनेक संकटाना सामोरे जावे लागते.म्हणुन नाराजी व्यक्त केली जात होती. हे सुर पाहता नेहमीच शिंदखेडा शहरातील वार्ड नऊचे अल्प मतांनी पराभूत झाले तरी सातत्याने जनतेच्या हितासाठी सेवेसाठी तत्पर असणारे व भाजपा रेल्वे प्रवासी आघाडीचे तालुका अध्यक्ष गोविंद प्रकाश मराठे ऊर्फ दादा मराठे यांनी दि. एक जानेवारी रोजी धुळे जिल्हयाचे माजी मंत्री तथा खासदार डाॅ.सुभाष भामरे व शिदखेडा मतदारसंघाचे माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन सादर केले.त्यातुन शिंदखेडा तालुक्याचे ठिकाण असून फौजदारी न्यायालय, तहसील कार्यालय, नगरपंचायत. पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय व शैक्षणिक द्रुष्ट्या मुलां मुलींचे शिक्षण घेण्यासाठी वसतिगृह आहे शिंदखेडा शहरातील व परिसरातील बाहेरील लोकांना व्यापारी खरेदी निमित्त परराज्यात येण्या जाणाऱ्या साठी भागलपुर – सुरत , पुरी – अहमदाबाद, अहमदाबाद – बरौनी हया जलद गतीने गाड्यांना थांबा आवश्यक आहे. तसेच कोरोणा काळात सुरत -भुसावळ ही पॅसेंजर पुर्ववत सुरू करावी अशी मागणी केली होती.त्यावर खासदार डाॅ.सुभाष भामरे यांनी देखील शिफारस केली होती. परंतु तीन महिने उलटुनही अद्याप रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. म्हणुन प्रवासी मध्ये तीव्र नाराजी पसरली असून उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.असा सुर व्यापारी व सर्व सामान्य लोकांमध्ये उमटत आहेत. त्यासाठी विद्यमान खासदार डाॅ.सुभाष भामरे व आमदार जयकुमार रावल यांनी विशेष लक्ष केंद्रित करून हया मागण्या पदरात पाडून घ्यावी.त्यासाठी आज रेल्वे स्थानक येथे भाजपा रेल्वे प्रवासी संघटना चे तालुका अध्यक्ष दादा मराठे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी राजेंद्र पाटील, बाळकृष्ण बोरसे, चंद्रकांत गोधवाणी, रवींद्र लखोटे, राजेश शहा, हसन बोहरी, मोहन परदेशी, प्रकाश गोधवाणी. सुभाष तलवारे, संदीप पारख आदींनी भेट दिली असता चौकशी करून जनसामान्यांना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.