महाराष्ट्रराजकीय
रमेश बोरणारे यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याचा शिवसेनेकडून निषेध
वैजापूर (अशोक पवार) वैजापूर तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार प्रा रमेश पाटील बोरणारे यांच्यावर सुडबुद्धीने व राजकीय दबावाला बळी पडून पोलीस प्रशासनाने जो खोटा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा प्रथमतः जाहीर निषेध व तो रद्द करावा या मागणीचे निवेदन आज सकाळी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तरी शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला आघाडी, युवासेना, कामगार आघाडी, दलित आघाडी, शिवसेना प्रणित सर्व आघाडी व शिवसैनिकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.