गुन्हेगारीमहाराष्ट्रराजकीय
शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
वैजापूर (प्रतिनिधी) शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी त्यांच्यावर जयश्री बोरणारे यांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला होता पण रमेश बोरनारे यांनी माझा पदरही ओढला होता असे जयश्री बोरणारे यांनी सांगितले व महिला आघाडी भाजपा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ व जयश्री बोरणारे यांनी वैजापूर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली.
जयश्री बोरणारे यांच्या जबाबावरुन विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैजापूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमाला गेल्याचा राग धरुन आमदार रमेश बोरनारे आणि इतरांनी महिलेस शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली होती. मारहाण झालेली महिला बोरनारे यांच्या चुलत भावजयी आहेत. राजकीय दबावामुळे विनयभंगाचे कलम लावले जात नसल्याचा आरोप पोलिसांवर होत होता.