महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडीचा महत्वपूर्ण निर्णय

दौंड (गौरव दिवेकर) दौंड तालुक्यातील अनेक गावात गेल्या काही दिवसापासून उद्भवलेल्या विजेच्या प्रश्नाच्या संदर्भात दिनांक ७ मार्च रोजी देशाचे नेते शरदचंद्र पवार यांची ‘पुणे’ येथे भेट घेतली असता सविस्तर चर्चा केली होती.

सद्या सर्वत्र उन्हाळ्याचे कडक दिवस सुरू झाले आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून दौंड तालुक्यात विजेचा प्रश्न गंभीर बनला असून, तालुक्यातील पिके करपून धोक्यात आली आहेत. तरी, विजेचा प्रश्न लवकर मिटवावा अशी मागणी यावेळी आदरणीय पवार यांच्याकडे केली होती. यावर लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री आणि संबंधित खात्याचे सचिव तसेच महाविकास आघाडीतील इतर नेत्यांच्या समवेत विजेच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एकत्रित बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल अशी माहिती पवार यांनी या भेटी दरम्यान दिली. शेतकऱ्यांची चालू पिके वाचवण्यासाठी काल महाविकास आघाडी सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज तोडणी केली आहे, त्यांचा वीजपुरवठा पुर्ववत केला जाणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल विधानसभेत केले. तसेच शेतकऱ्यांच्या हातात पुढचे पिक येईपर्यंत म्हणजेच पुढील तीन महिने वीजपुरवठा खंडीत केला जाणार नाही.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे