“वसमारच्या दांपत्याला आदर्श माता -पिता पुरस्कार”
मालपूर ता.शिंदखेडा (प्रभाकर आडगाळे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले डाॅं. रविंद्र भाऊराव आजगे हे औषध निर्माण आधिकारी म्हणुन सेवा करित आहेत. त्यांच्या माता-पितांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. हे दांपत्य साक्री तालुक्यातील वसमार गावाचे मुळ रहिवाशी असुन साधी राहणी व ऊच्च विचाराचे धनगर समाजातील आदर्श असे आजगे परिवार. त्यांना पुण्यातील सुसंगत फांडेशनतर्फे राज्यस्तरिय आदर्श माता-पिता पुरस्काराने गौरवण्यात आले.
सदर कार्यक्रम एस.एम.जोशी. सभाग्रुहात पुणे येथे झाला. त्याप्रसंगी डाॅ.शिकापुरकर यांच्या शुभ हस्ते देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख(माजी प्रांतपाल’,रोटरी अंतरराष्टीय ऊध्योजक) तसेच विशेष अतिथि मारुती लंगडे(संस्थापक सजाईग्रुप पुलकोट जि.सातारा),डाॅ. सु. भ. न्हाळदे (संस्थापक अध्यक्ष सुसंगत फाॅंडेशनपुणे), धोंडीराम गडदे आदि उपस्थित होते.
वसमार हे साक्री तालुक्यातील एक छोटेसे टुमुकदार गाव तेथील धनगर वस्तीतील हे प्रेमळ सुस्वभावी ,मितभाषी असा आजगे परिवार या दांपत्यांना दोन मुले, सुना, नातवंडे, असा सुशिक्षित परिवार आहे. या परिवाराचे हे दांपत्याने अठारा विश्व दारिद्रातुन आपला खडतर मार्गक्रम करुन मुलांना शिकवले. दोघे मुले डाॅक्टर आहेत. त्यांना शिकवले. आपल्या गरिबीतुन डाॅक्टर रविंद्र आजगे म्हाणाले कि, आई वडीलांचा झालेला हा गौरव (सन्मान) आमच्यासाठी फार फार आनंदाचा व आभिमानाचा क्षण आहे. अशी भावना देशदुतशी बोलतांना व्यक्त केली.
आई बाबांच्या मार्गदर्शनाने आम्हीही आमच्या मुलांना ऊच्चशिक्षणासाठी पाठवले आहे. मी औषध निर्माण आधिकारी आहे. तर पत्नी देखील शिक्षिका आहेत. माझा लहानभाऊ नवल आजगे हे देखील जिल्हा कार्यक्रम समन्वयक आरोग्य विभाग जिल्हा परिषेद जळगाव येथे नोकरी करित आहेत व त्यांची पत्नी देखील महसुल विभाग शिंदखेडा येथील वर्षी या गावात तलाठी पदावर कार्यरत आहेत. हे सर्व श्रेय आमच्या आई वडीलांना देतो. डाॅ.सुनिल धनगर यांनी सुञसंचालन केले.